Header Ads Widget

खोटा 498 (A) कौटुंबिक हिंसाचार | domestic violence चा खटला दाखल करणाऱ्या पत्नीला बसणार चपराक


खोटा 498 (A) कौटुंबिक हिंसाचार | domestic violence चा खटला दाखल करणाऱ्या पत्नीला बसणार चपराक

Police case, 498 A, ipc, 498,






 खोटा खटला भरणार्या पत्नीला सोडचिठ्ठी

नमस्कार मित्रांनो

 मला एका मिञाने विचारले की माझ्या पत्नीने माझ्यावर पोलीस स्टेशन मध्ये खोटी FIR | तक्रार नोंदवली आहे त्यात तिने कौटुंबिक हिंसाचार | domestic violence  चे अनेक आरोप केले आहेत मात्र प्रत्यक्षात असा कोणताही त्रास तिला झालेला नाही त्यामुळे ही तक्रार साफ खोटी असून मला व माझ्या परिवाराला या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे व आम्हांला या केसेसचा खुप ञास होत असुन आमची मानसिक व आर्थिक हानी होत आहे तरी मला या खोट्या केस मधून मुक्त व्हायचे आहे व मला व माझ्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक ञास देणाऱ्या पत्नीशी मला घटस्फोट घ्यावयाचा आहे तर मी काय करावे या संदर्भात मला मार्गदर्शन करावे व सदरचा  लेख अनेक बांधवाना अतिशय महत्त्वाचा मार्गदर्शक ठरणार आहे तर अवश्य वाचा व आपल्या ब्लागला डाव्या कोपऱ्यातीला ३ रेषा | 3 Lines वर क्लिक केल्यानंतर फाँलो | Follow या बटनावर क्लिक करुन सहकार्य करावे हि विंनती

चला तर मग बघुया सविस्तर माहिती आपले कायदे या ब्लाँगवर

सर्वप्रथम 498 अ | Domestic Violence समजुन घेऊ व या गुह्यासाठी अटक करतांना पोलीसांना कोणत्या अटिंचे पालन करावे लागते


Indian Penal Code 1860 according_to sec 498 A


भारतीय दंड संहिता कलम- 498 (अ) अन्वये जो कोणी पती किंवा पतीचा नातेवाईक सामुहिकपणे महिलेवर अत्याचार करेल व स्त्रीला क्रूरतेच्या अधीन करेल त्याला तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होईल आणि दंडासही जबाबदार असेल.

1]  कोणत्याही प्रकारची अनिष्ट आचरण जी स्त्रीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते किंवा स्त्रीला जीव, अंग किंवा आरोग्यासाठी मानसिक किंवा शारीरिक गंभीर इजा किंवा धोका निर्माण करण्याची शक्यता आहे किंवा

 2] महिलेचा छळ करणे जिथे अशा प्रकारचा छळ तिच्या किंवा तिच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मालमत्तेची किंवा मौल्यवान सुरक्षेची बेकायदेशीर मागणी पूर्ण करण्यासाठी छळवणुक करणे

498 अ गुन्ह्यासाठी अटक करतांना अटि

सदरील गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असला तरी त्यासाठी CrPC चे कलम 41अ व 41ब मधिल तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे हि सुधारणा 2010 मध्ये करण्यात आली असुन त्यामुळे बर्याच पुरुषमंडळीसाठी दिलासादायक बाब असल्याचे निदर्शनास आले आहे

Criminal Procedure Code 1973 according Sec 41 A

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम ४१अ  अन्वये

1] आरोपी पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता तपासणे गरजेचे आहे व अशी शक्यता नसेल तर आरोपीस अटक करता येणार नाही

2] आरोपीस अटक केली नाही तर गुन्हय़ाचा तपास नीट होणार नाही का ते बघणे म्हणजेच आरोपीची तपासकामात हस्तक्षेप होणार नाही हे बघणे माञ आरोपीचा हस्तक्षेप होणार नसल्यास अटक करता येणार नाहि

3] आरोपी पुराव्यात हस्तक्षेप करेल याला न्यायालयीन भाषेत 'Evidence Tamper ' करणे असे म्हणतात, हे बघणे गरजेचे आहे माञ त्यात आरोपीचा हस्तक्षेप होणार नसेल तर अटक करता येणार नाहि

4] आरोपी व्यक्ती कडून साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता आहे का याची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरेल माञ दबाव येण्याचे कारण नसल्यास आरोपीस अटक करता येणार नाही

5] मुख्य म्हणजे खटला पुढे चालु असतांना खटल्याच्या कामात तारखेला आरोपी हजर होण्याची खात्री करणे माञ आरोपी न्यायालयात वेळोवेळी हजर राहिल याची खाञी असेल तर अटक करता येणार नाही

 असे महत्त्वाचे निकष लावून तशा शक्यता पडताळून पाहणे पोलींसाना गरजेचे आहे अन्यथा कारणाशिवाय अटक केल्याचे निदर्शनास आले, तर संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर ‘कंटेम्प्ट ऑफ कोर्ट’ची कारवाई केली जाईल, असेही नमूद आहे.

 

Criminal Procedure Code 1973 according Sec 41 B

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम ४१ब  अन्वये प्रत्येक पोलीस अधिकारी | Police Officer आरोपीला अटक करतानाच्या अटि

1] पोलीस अधिकारी च्या नावाची अचूक व दृश्यमान Name Plate असावी ज्यामुळे सहज ओळख पटेल | visible and clear identification

2] अटकेचे निवेदन तयार करा | memorandum of arrest

  A- कमीतकमी एका व्यक्तीने साक्षीदार म्हणुन सही केलेली असावी व तो व्यक्ती अटक केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचा सदस्य असावा किंवा जिथे अटक झाली आहे त्या परिसरातील प्रतिष्ठित नागरिक असावा | one witness, who is a member of the family of the person arrested or a respectable member

B- अटक केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी |Countersigned  केलेली असावी

3] अटक केलेल्या व्यक्तीला अटकेचे कारण कळवावे व अटकेची माहिती नातेवाईक किंवा त्याच्या मित्राला  माहिती देणे आवश्यक आहे |
memorandum is attested by a member of his family, that he has a right to have a relative or a friend

 अटक |  Arrest संबधी सविस्तर माहितीसाठी खालील पोस्टला भेट | Visit द्या

 

DV CASE में पत्नी से पूछिए ये 20 प्रश्न, Cross Examination Of Wife In DV Case, Dv Case Evidence, dv, sunny sharma, advocate sunny sharma, soch par prahaar, cross, cross examination, जिरह, cross questions in 498a cases, maintenance in dv act, cross questions to wife in maintenance cases, cross questions in dv act cases, how to cross wife in maintenance cases, law on maintenance cases, cross questions from wife, interim maintenance
👆👆Click Here This Post👆👆


भारतीय दंड संहिता कलम- 498 (अ) या गुन्ह्यातुन निर्दोष ठरलेल्या पतीला घटस्फोटाचा  (Divorce)  दावा करू शकतो आणि घटस्फोट घेऊ शकतो त्यासाठी सदरील 498 A | ४९८ अ चा दावा हा क्रुरपणा मानला जाईल त्यामुळे Crultry Divorce Ground असेल

 
Hindu marriage Act 1955 according sec 13 (1) (I , A)

 
हिंदू विवाह कायदा 1955 च्या घटस्फोटाच्या कलम 13 (1) (I -A ) अन्वये क्रुरतेच्या | domestic violence आधारावर घटस्फोटासाठी याचिका दाखल केली जाते



1]  कोणताही विवाह सुरू होण्यापूर्वी किंवा नंतर पती किंवा पत्नी या दोघांनी सामुहिक व समझोत्याने सादर केलेल्या याचिकेवर घटस्फोटाच्या आदेशाद्वारे विसर्जित केले जाऊ शकते

IA] विवाहाच्या झाल्यानंतर याचिकाकर्त्याशी क्रूरतेने वागणे

क्रूरता | domestic violence  - पती अथवा पत्नी घटस्फोटाचा खटला दाखल करू शकतात जेव्हा त्याला किंवा तिला कोणत्याही प्रकारच्या मानसिक छळवणुक केली जाते , शारीरिक दुखापत केली जाते व दुखापतीमुळे जीव, अंग आणि आरोग्यास धोका निर्माण केला जातो. मानसिक छळाद्वारे क्रूरतेच्या अमूर्त कृत्यांचा समावेश होतो एका एकाच कृत्यावर नव्हे तर अशा घटनांची मालीकाच रचली जाते त्यात अन्न नाकारले जाणे, सतत वाईट वागणूक  देणे आणि हुंडा घेऊन येणेसाठी गैरवर्तन करणे विकृत लैंगिक कृत्य करणे आणि अशा घटना क्रूरतेखाली समाविष्ट केल्याची काही उदाहरणे आहेत.
त्यामुळे अनेक निर्णयांमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालयाने विवाह क्रूरतेच्या कारणास्तव विसर्जित केले आहेत 

त्यातीलच एक अतिशय महत्त्वाची केस खालीलप्रमाणे  


A Bench of Justice Bhushan and Justice Sinha in the case titled


RANI NARASIMHA SASTRY


V/S


 RANI SUNEELA RANI


on 19.11.2019 has observed that once acquitted for an offence under Section-498A, husband can claim curelty and seek divorce.


वरील केसमध्ये मा. सुप्रीम कोर्टाने 19 नोव्हेंबर 2019 रोजी रानी नरसिम्हा विरुद्ध रानी सुनीला या खटल्यातील मा. न्यायमूर्ती भूषण आणि मा. न्यायमूर्ती सिन्हा यांच्या खंडपीठाने असे नमूद केले आहे की एकदा मुलीने पतीच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांविरोधात खोटी तक्रार दाखल केली असेल आणि जर संबंधित दंडाधिकाऱ्याने कुटुंबातील सदस्यांना IPC 498 A च्या प्रकरणात निर्दोष सोडले असेल तर सदरील गुन्हा हा पती व त्याच्या कूटुंबाची हेतु पुरस्कर केलेली मानसिक छळवणुक व पतीवर क्रूरता आहे असे मानुन सदरील लग्न विसर्जित करण्याचे चांगले कारण आहे.
एकंदरीत पत्नी ने पति वर 498 (अ) (Domestic Violence) अंतर्गत दावा दाखल केल्यास व तो दावा खोटा असल्यास पतीचे निर्दोष मुक्तता झाल्यावर पती जवळील कौटुंबिक न्यायालयात (Family Court) घटस्फोट (Divorce) साठीअर्ज करू शकतो व खोट्या दाव्याचा निकाल त्यासाठी पुरावा असेल म्हणून पत्नीने केलेल्या खोट्या दाव्यामुळे पत्नीला घटस्फोट देता येतो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या