Header Ads Widget

सावधान धमकी | Threat देताय तर सावधान

धमकी | Threat देताय तर सावधान | Be careful if threatening


तुला बघून घेईन तुझी वाट लावतो तुला ठार करतो अशा अनेक प्रकारच्या धमकी आपल्याला ऐकायला मिळतात आणि कधीतरी एखादा महाशय आपल्याला धमकी देतो आणी बर्याचवेळा या धमक्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये केसेस हि नोंदवल्या जातात त्यावेळी बरेच लोकांचा असा अनुभव असतो की धमक्याही वेगवेगळ्या स्वरुपाच्या असतात काही धमक्या सौम्य असतात तर काही गंभीर स्वरूपाच्या असतात (उदा. तुला ठार करतो वगैरे) तर काही धमक्या समोरील व्यक्तीला अपराध करण्यासाठी उत्तेजित करतात (उदा. तू हात तर लावून दाखव वगैरे) मग बऱ्याच वेळा लोक विचारतात यावर कायद्यात काही तरतुदी आहेत का?
 तर हो आहेत आणि काय तरतुदी आहेत ते पाहुया आपले कायदे या ब्लॉगवर

Indian Penal Code 1860 According to Sec - 503

 

 भारतीय दंड संहिता 1860  चे कलम 503 मध्ये धमकी कशाला म्हटले जाईल त्याची व्याख्या देण्यात आली आहे ति पुढिलप्रमाणे एखाद्या व्यक्तीला ख्यातीला हानी पोहचवण्याची , संपत्तीला नुकसान पोहचवण्याची , शारीरिक नुकसान किंवा हानी करणारी , पारिवारिक नुकसान किंवा हानी पोहचवणारी भाषा अथवा अपराधासाठी उत्तेजित करणारी आपत्तिजनक भाषा म्हणजे धमकी होय

Indian Penal Code 1860 According to Sec - 504
 

भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 504 अन्वये एखाद्या व्यक्तिला धमकी देऊन त्या व्यक्तीच्या हस्ते  सामाजिक शांतता भंग करण्याच्या हेतूने दिलेली धमकी किंवा अपमान करणे हा अपराध मानला जाईल हा जामीन पात्र अपराध  असून दोन वर्ष सजा व दंडाचे प्रावधान आहे
 

Indian Penal Code 1860 According to Sec - 506

 

भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 506 अन्वये धमकी देणे किंवा धाकदपटशा दाखवणे यासाठी दोन वर्ष कैद व दंड किंवा दोन्ही आणि जर धमकी गंभीर स्वरूपाचे असेल किंवा जबर दुखापत घडून आणणे मृत्यु घडून आणणे किंवा ख्याती संपत्ती शारीरिक पारिवारिक हाणी पोहोचवण्याची असेल तर सजा सात वर्षाची असून दंडाच्या प्रावधान आहे तसेच 
 

Indian Penal Code 1860 According to Sec - 509

 

भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 509 अन्वये एखाद्या महिलेचा विनयभंग होईल असा शब्द उच्चारणे कायद्याने अपराध मानला जाईल त्यासाठी एक वर्ष कैद दंडाचे प्रावधान आहे
 
त्यामुळे धमकी देणे आत्ता चांगलेच महागात पडणार असुन दोन वर्षापेक्षा जास्त सजा अथवा दंडाचे प्रावधान आहे त्यामुळे जर कोणी तुम्हाला धमकी देत असेल अथवा तुम्ही कोणाला धमकी देत असाल तर सावधान
{"@context":"https://schema.org","@type":"FAQPage","mainEntity":[{"@type":"Question","name":"Google run my blog ","acceptedAnswer":[{"@type":"Answer","text":"My blog as tu run aaple kayde "}]}]}

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या