Header Ads Widget

तुमच्यावर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे का? / Assault

  • काय तुमच्यावर कोणी हल्ला करण्याचा हावभाव करत आहे का ?
नमस्कार वाचक मित्रांनो 

अनेकदा आपण आपल्या वैयक्तिक किंवा सार्वजनिक स्थानावर उभे असताना जर आपल्याला कोणी अन्यत्र इसम ओळखीचा किंवा अनोळखी व्यक्ती हातात काठि, लोखंडी राँड अथवा अन्यञ इजा पोहचवण्यासारखी वस्तु हातात घेऊन आपणास घाबरवण्याचा किंवा दडपण आणण्याचा प्रयत्न करत असेल हल्ला करण्याचा हावभाव करत असेल किंवा मारहाण करण्याच्या हेतुने अंगावर धावुन येत असेल तर तुम्ही त्याला चांगलाच धडा शिकवु शकता तो कसा चला तर मग पाहुया आपले कायदे या ब्लाँगवर

      Assault

० Indian Penal code 1860
        according_to sec 351 

भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 351 अन्वये
एखादा इसम खाजगी अथवा सार्वजनिक जागेवर हातात  इजा पोहचेल अशी वस्तू घेऊन तुम्हांला घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमच्या अंगावर धावून येत असेल किंवा तसा प्रयत्न करत असेल अथवा पाळीव कुञा किंवा इतरञ पाळीव प्राणी अंगावर सोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यास हल्ला (Assault) मानले जाईल 

० Indian Penal code 1860  
        according_to sec 352

भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 352 अन्वये वरील कलमात नमुद केल्याप्रमाणे
एखादा व्यक्ती तुमच्यावर हल्ला करण्याची तयारी करत असेल,  हातात काठी लोखंडी राँड अथवा अन्य इजा पोहचेल अशी वस्तु किंवा घरातील पाळीव कुञा, पाळीव बैल अंगावर सोडण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा इसमाविरुध्द सदर कलमा अन्वये गुहा (FIR) नोंदवु शकता 
त्यासाठी 3 महिने कैद व दंडाची शिक्षा ठोठावण्यात येईल 
हा जामिनपाञ अपराध आहे

जर असे कोणी आपल्या बाबत करत असेल तर तात्काळ सदर इसमावर गुन्हा दाखल करून त्याला चांगलीच अद्दल घडवू शकता







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या