जेव्हा पोलीस तुमची तक्रार लिहून घेत नाही किंवा तुमच्याशी दुर्रव्यवहार करतात अशावेळी काय कराल | What to do when the police don't write down your complaint or mistreat you
बघा हे नियम मग पोलीस तुम्हाला घाबरतील
मित्रांनो सोशल मीडियावर आपल्याला पोलिसांनी सामान्य जनतेची केलेला दूर व्यवहाराचा व्हिडिओ बघायला मिळतो व आपल्याला वाईट वाटते आणि रक्षकचं असे व्यावहार करत असतील तर सामान्य मानसाने काय करावे असाच काल माझ्या एका मिञाचा मला फोन आला व मी पोलिस स्टेशनला आलो असल्याचे सांगितले मात्र पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेणे तर सोडाच मला पोलीस स्टेशन मधून हाकलून लावले व माझ्याशी दुर्व्यवहार केल्याचे सांगितले त्यामुळे मी आता काय करू आता काय करू असा प्रश्न त्यांनी मला विचारला आणि हा प्रश्न केवळ त्यालाच नाही तर तुमच्यापैकी अनेक जणांना असा प्रश्न पडलेला असावा चला तर मग बघुया अशावेळी आपण काय करू शकतो आपल्या आपले कायदे या ब्लाँगवर
अनेक लोकांचा असा अनुभव आहे की पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस एक तर आपले ऐकून घेत नाही त्यामुळे पोलिसांवरचा असलेला विश्वास दुरावत चालला आहे त्यामुळे असेच जर तुमच्या सोबत होत असेल तर अथवा पोलीस अधिकारी कर्मचारी त्याचे कर्तव्य बजावत नसेल तर
Police Complaint Authority
एखादा पोलीस कर्मचारी त्याचे कर्तव्य बजावत नसेल किंवा विनाकारण तुमच्याशी दुर्व्यवहार करत असेल तर त्या पोलिस कर्मचाऱ्याची ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्ही पोलीस कम्प्लेंट अथोरिटी ला पाठवून सदर पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार करू शकता त्यामुळे सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही होईल
Vigilance Department
एखादा पोलिस कर्मचारी तुमच्याशी दुर्व्यवहार करत असेल अथवा त्याचे कर्तव्य बजावण्यात कसूर करत असेल तर अशा पोलीस कर्मचाऱ्यांची ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही विजिलेंस डिपार्टमेंटला पाठवून सदर पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार करू शकतात त्यामुळे सदर पोलीस कर्मचाऱ्याला त्याचे सबब द्यावी लागेल व त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होईल
मित्रांनो असे अनेक विविध कायदेशीर माहितीसाठी आपल्या ब्लॉग आपले कायदे आपला अधिकार याचे कायमस्वरूपी दर्शक बना व नवनवीन कायद्यांची माहिती जाणून घ्या
0 टिप्पण्या