Header Ads Widget

कोर्ट मँरेज | Court Marriage सविस्तर माहिती | Detail information about Court Marriage

कोर्ट मँरेज(Court Marriage) सविस्तर माहिती | Detail Information About Court Marriage




कोर्ट मँरेज(Court Marriage) सविस्तर माहिती | Detail Information About Court Marriage

सध्या या समाजात एक नवीन गोष्ट सुरू झाली आहे आणि ती म्हणजे कोर्ट मॅरेज अनेकदा तरुण मित्र प्रेमविवाहातून कोर्ट मॅरेज करण्याचा विचार करत असतात किंवा काही कुटुंब अथवा दोन्ही परिवार कोर्ट मॅरेज चा पर्याय निवडतात अनेकदा लाखो रुपये खर्च करून केलेला विवाहाला कायद्यानुसार कायदेशीर स्वरूप देण्यासाठी कोर्ट मॅरेज पर्याय निवडतात अथवा लॉकडाऊन च्या काळात सर्वांच्या पसंतीचा विवाह सोहळा म्हणजे कोर्ट मॅरेज मानला गेला आणि त्यामुळे अगदी कमी लोकांमध्ये विवाह सोहळा संपन्न होऊ शकला या अनुषंगाने मला अनेकदा अनेक तरुण मित्रांचे वारंवार फोन येत असतात व कागदपत्रे document कोणकोणते हवे असतात अशी विचारपुस सुरु होते  कोर्ट मॅरेजसाठी आम्हाला कोठे संपर्क करता येईल असे वारंवार तरुण मित्र फोन करून विचारत असतात आज या प्रश्नांचे उत्तर घेऊन आलो आहोत आपल्या ब्लॉगवर त्याचं नाव आहे आपले कायदे आपला अधिकार


कोर्ट मॅरेज कोण करू शकते

वयाचे 18 वर्षे पूर्ण असलेली मुलगी व वयाचे 21 वर्ष पूर्ण असलेला मुलगा दोघेही सहमतीने कोर्ट मॅरेज करू शकतात
 

कोर्ट मॅरेज साठी (Court Marriage) कोण कोणते कागदपत्रे (Document) हवे असतात 

१] जन्माचा पुरावा
[  ] जन्मदाखला 
[  ] दहावीचे सर्टिफिकेट 
[  ] पासपोर्ट


2] पत्त्याचा पुरावा
[  ] मतदान कार्ड
[  ] आधार कार्ड

3] 3 साक्षीदार त्यांचे
[  ] पासपोर्ट फोटो 
[  ] आधार कार्ड 
[  ] मतदान कार्ड
[साक्षीदार हे तुम्ही राहत असलेल्या अथवा तुम्ही लग्न करत असलेले राज्यातले हवे आहेत]


4]मुलाचे ६ पासपोर्ट फोटो


5] मुलीचे ६ पासपोर्ट फोटो 
 
 
 What are the Documents Required for a Court Marriage
 

1] Birth proof

[  ] birth certificate 
[  ] 10th class certificate
[  ] passport


2]address proof

[  ] passport Photo
[  ] voter ID
[  ] Aadhar card

3] 3 witness

[  ] passport photo
[  ] ID proof



4] Groom 6 passport size photo

5] Bride 6 passport size photo
 
  हे सगळे कागदपत्रे घेऊन तुमच्या जिल्हा न्यायालयात संपर्क करणे आवश्यक असते


कोर्ट मॅरेज करण्यासाची प्रक्रिया | 
Court Marriage Process 

कोर्ट मॅरेज करण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागतो या कालावधीत तुम्ही दिलेल्या पत्त्यांवर नोटीस पाठवून खात्री केली जाते व  किंवा या विवाहास कोणाची हरकत असल्यास ती तिस दिवसांच्या आत  नोंदवली जाते व विवाह निबंधक त्याची पडताळणी करतात मात्र सज्ञान मुलगा मुलगी विवाहसाठी तयार असल्यास नोटीसीवर हरकत नोंदवल्यास फारसा फरक पडत नाही

 वधू आणि वर आणि तीन साक्षीदारांनी विवाह निबंधकाच्या उपस्थितीत किंवा रजिस्ट्रारच्या कार्यालयाच्या अगदी जवळ असलेल्या ठिकाणी घोषणापत्रावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.  या घोषणेत असे म्हटले आहे की पक्षकार त्यांच्या संमतीने कोर्ट मॅरेज करत आहेत
 
 कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट | 
Court Marriage Certificate


 सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर विवाह निबंधक कोर्ट मॅरेज सर्टिफिकेटमध्ये कोर्ट मॅरेजचा तपशील टाकतो.  हे विशेष विवाह कायद्याच्या अनुसूची IV मध्ये नमूद केलेल्या तरतुदींनुसार आहे.  प्रमाणपत्र 15 ते 30 दिवसांत दिले जाईल. संपूर्ण कोर्ट मॅरेज प्रक्रिया पूर्ण होण्यास साधारणपणे 30 ते 60 दिवस लागतात.
 
अशी सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे हाताळून कोर्ट मॅरेज करणे योग्य आहे कारण असे करून देणारे अनेक संस्था अस्तित्वात आहे मात्र ते विवाह कायदेशीर विवाह किंवा कोर्ट मॅरेज असतीलच असे नाही त्यामुळे न्यायालय प्रक्रियेचा अवलंब करा.
 
 
कोर्ट मॅरेज नियम मराठी, कोर्ट मॅरेज लग्न, कोर्ट मॅरेज कसे करावे, Court marriage documents list in marathi ,कोर्ट मॅरेज माहिती ,कोर्ट मैरिज सर्टिफिकेट, कोर्ट मैरिज लिस्ट, कोर्ट मैरिज फीस
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या