Header Ads Widget

संपत्तीविषयी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नक्की बघा नाहीतर गमवावी लागेल तुम्हाला तुमची संपत्ती | Be sure to watch the Supreme Court's decision on the property or you will lose your property

बेकायदेशीर कब्जा, वडिलोपार्जित संपत्ती, वडिलोपार्जित मालमत्ता वाटप, वारसाहक्क कायदा, वाटणी पञ कायदा,

संपत्तीवरील बेकायदेशीर कब्जा 
12 वर्षापेक्षा अधिक काळ कब्जा
करणारा होणार संपत्तीचा 
कायदेशीर मालक



नमस्कार मित्रांनो नेहमी लोक आम्हाला विचारत असतात की आमच्या संपत्तीवर इतरत्र कोणाचा कब्जा आहे किंवा तुमचा इतरत्र कोणाच्या तरी संपत्तीवर कब्जा असतो यासंबंधात वारंवार वकिलांचा सल्ला घेतला जातो व हा कब्जा खाली कसा करावा किंवा भाडेकरूचा काय हक्क असतो  तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने भाडेकरू व संपत्ती धारकाच्या बाबतीत नवे निर्णय घेत असतात व त्यानुसार कायद्यातील तरतुदी बदलत असतात असाच निर्णय सन 2019 मध्ये संपत्ती वरील १२ वर्षाच्या कब्जा बाबत अतिशय महत्वाचे निर्णय दिला आहे काय आहे तो निर्णय बघूया आपले कायदे या ब्लॉगवर

माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय बघण्याआधी आपण संपत्तीचे प्रकार पाहूया

संपत्तीचे प्रकार

1- चल संपत्ती [Moveble Property]
2-अचल संपत्ती [Imoveble Property]


1]- चल संपत्ती :- जी संपत्ती एका जागेवरून दुसऱ्या जागी वाहून नेली जाऊ शकते त्या संपत्तीला चलसंपत्ती म्हणतात (उदाहरणार्थ कार, फर्निचर)

2]- अचल संपत्ती :-  जी संपत्ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहून घेऊन जाऊ शकत नाही केव्हा त्याची जागा बदलू शकत नाही त्यास त्याला संपत्ती म्हणतात (उदाहरणार्थ जमीन, घर इत्यादी)

माननीय सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अचल संपत्ती च्या संदर्भात असून तो अचल संपत्ती वरच लागू होईल

Limitation Act 1963
Sec 65

लिमिटेशन अँक्ट 1963 च्या कलम 65 संदर्भात निर्वाळा देताना माननीय सर्वोच्च न्यायालय असे म्हणते की जर कोणाचा तुमच्या खाजगी संपत्तीवर 12 वर्षांपेक्षा अधिक काळ कब्जा असेल किंवा तुमचा एखाद्याच्या संपत्तीवर 12 वर्षांपेक्षा अधिक काळ कब्जा असेल तर कायदेशीर रित्या सदर संपत्तीचे तुम्हाला कायदेशीर अधिकार मिळतात मात्र ती संपत्ती खाजगीरित्या धारण केलेली असावी

सरकारी जमीन :-

माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार जर ती जमीन सरकारी असेल तर ती बारा वर्षाच्या अखत्यारीत येत नसून त्यासाठी सदर कब्जेदारचा कब्जा 30 वर्षांपेक्षा अधिक काळ असला पाहिजे तर तो त्या संपत्तीचा कायदेशीर रित्या अधिकार प्राप्त करू शकतो

संपत्तीच्या मालकाचे अधिकार 

या नंतर सर्वोच्च न्यायालयाने संपत्तीच्या मालक (Landlord) च्या अधिकारांबाबत निर्वाळा देताना सांगितले की जर एखादा व्यक्ती तुमच्या खाजगी संपत्तीवर कब्जा केलेला असेल व त्यात तुम्ही १२ वर्षाच्या आत लीगल नोटीस  (Legal Notice) अथवा कोर्ट पिटीशन Court petition) फाईल केले असेल तर सदर कब्जेदाराचा कब्जा अवैध मानला जाईल त्यानंतर त्याने त्या संपत्तीवर बारा वर्षाच्या अधिक काळ कब्जा ठेवला तरी तो कब्जा अवैधरीत्या म्हणला जाईल व त्याला त्या संपत्तीचे अधिकार प्राप्त होणार नाहीत

त्यामुळे मुळे संपत्ती धारकांना आपल्या संपत्तीचा अधिकार इतरत्र कोणाला मिळण्याआधी जागृत होण्याचे गरज आहे व आपली संपत्ती विनाअडथळा सदर व्यक्तीला 12 वर्षांपेक्षा अधिक काळ भाड्याने दिल्यास तो व्यक्ती सदर संपत्तीचा कायदेशीर मालक होतो बऱ्याच केसेस मध्ये असे बघायला मिळते की संपत्ती धारकाकडून संपत्ती खाली करण्याचे सांगितले असतानाही धाकदडपशहा दाखवून संपत्तीवर कब्जा कायम करत असतात किंवा कब्जा खाली करत असतात तेव्हा कायदेशीर मदत घेणे आवश्यक असते



पुढिल विषय :-

वडिलोपार्जित जमीन विक्री,  वारसा हक्क कायदा 2020,  वडिलोपार्जित जमीन नावावर करणे,  वारसा हक्क कायदा 2017,  वडिलांच्या संपत्तीत मुलीचा अधिकार,   मुलींचा  वारसा हक्क कायदा,  वारसा हक्क कायदा 2020,   वाटणी पत्र रद्द कसे करावे,
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या