कोणी मृत व्यक्तीच्या संपत्तीचा
अपहार करत असेल तर
अनेकदा आपल्याला एक्सीडेंट किंवा अन्य ठिकाणी एखाद्या मृत व्यक्तीच्या जवळ काही किंमती ऐवज होता व तो ऐवज इतरत्र इसमाने चोरून अथवा अपहार केल्याचे आपल्याला दिसून येते अथवा घरात काम करणारा नोकर किंवा कारकुनही मृत व्यक्तीच्या संपत्तीचा अपहार करतो अशा वेळी मयताचे नातेवाईक असे म्हणतात की आमचा असा ऐवज आमच्या मृत व्यक्ती कडे होता आणि तो आता नाही आहे तर त्यावर काही पर्याय आहे का तर हो आहे चला तर मग बघुया काय आहे तो पर्याय आपल्या ब्लाँग नाव आहे त्याचं नाव आहे
आपले कायदे आपला अधिकार
Bharatiya Nyay Sanhita 2023 Sec 315
भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 314 अन्वये एखादी व्यक्ती मृत व्यक्तीच्या जवळ असलेल्या एखाद्या किंमती ऐवजाचा किंवा त्याच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेचा अपहार करते किंवा तो ऐवज चोरून घेते तेव्हा भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 314 अन्वये अपराध मानला जाईल
या अपराधासाठी त्या व्यक्तीला तीन वर्षाची सजा व दंड आकारण्यात येईल
हा दखलपात्र गुन्हा असून त्यासाठी जामीन मिळणे शक्य आहे मात्र हा विना तडजोडीचा गुन्हा आहे त्यात तडजोड होणे शक्य नाही
परंतु सदर व्यक्ती मृत झाली असेल व त्या व्यक्तीचा कारकून नोकर सदर मृत व्यक्तीच्या ताब्यात असलेल्या संपत्तीचा मालमत्तेचा किंवा मृत व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या मौल्यवान ऐवजाचा अपहार करत असेल किंवा चोरी करत असेल अशा केसेस मध्ये त्या नोकरास अथवा कारकुणास सात वर्षाची सजा व दंड आकारण्याचे प्रावधान करण्यात आले आहे हा दखलपात्र व जामीनपात्र गुन्हा असुन हा विना तडजोडी गुन्हा असून त्यात तडजोड होणे अशक्य आहे
तर मित्रांनो असा गुन्हा करताना आपल्याला कोणी आढळल्यास या कायद्याअंतर्गत सदर व्यक्तीला सजा मिळवून देता येईल
0 टिप्पण्या