कौटुंबिक अत्याचाराचा | Domestic Violence खोटा खटला करणाऱ्या पत्नीला सोडचिठ्ठी
मित्रांनो बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला त्याची पत्नी खोटा हुंडाबळी किंवा कौटुंबिक अत्याचाराचा फौजदारी पात्र गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असेल अशावेळी जवळपास सर्वच कुटुंबाची बदनामी होते तर एखादी महिला खोटा गुन्हा दाखलही करते अशावेळी तर पोलिसांकडून पाहूनचार ही घ्यायची वेळ येते जवळपास सामान्य माणसाची चांगलीच पंचाईत होते व काय करावे असे माहीत नसते त्यावेळी चांगलीच धावपळ होते व शारीरिक मानसिक व आर्थिक पिळवणूक होते त्यामुळे बरेच असे कुटुंब महिलांच्या दडपणाखाली असतात तर घरातील सासरे सासू दीर नणंद आदी अन्य लोकांचा ही छळ सुरू असतो कारण लोकांच्या मनात 498 सारख्या केसेसची भिती असल्यामुळे सुन अथवा पत्नीकडुन होणारा अत्याचार मुकाटयाने सहन करतात तर लोक बऱ्याच वेळेस आम्हालाही पर्याय विचारतात चला तर मग पाहूया काय आहे पर्याय आपल्या ब्लॉग वर त्याचं नाव आहे आपले कायदे आपला अधिकार
(माञ एखाद्या महिलेवर खरचं अत्याचार होत असेल तो अपवाद वगळून)
Indian Penal Code 1860 According to Sec - 503
भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 503 मध्ये एखाद्या व्यक्तीला अन्यायाची धमकी देणे फौजदारी पात्र धाकदपटशा दाखवणे हा अपराध मानला जाईल त्यामुळे एखादी व्यक्ती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असेल तर तो अपराध मानला जाईल त्यामुळे पत्नी कौटुंबिक अत्याचाराचा खोटा खटला भरण्याची धमकी देत असेल तर पत्नी वरही या कलमान्वये गुन्हा नोंदवू शकतो
Indian Penal Code 1860 According to Sec - 506
भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 506 धमकी देणे धाकदपटशा दाखवणे यासाठी दोन वर्ष कैद व दंड किंवा दोन्ही आणि जर धमकी गंभीर स्वरूपाचे असेल किंवा जबर दुखापत घडून आणणे व ख्याती संपत्ती शारीरिक पारिवारिक आणि पोहोचवण्याची असेल तर सजा सात वर्षाची असून दंडाच्या प्रावधान करण्यात आले आहे
आणि एखाद्या महिलेने खोटा कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाच तर मात्र त्याविषयी पुरावे नसतात आणि न्यायालयात पुराव्याअभावी हा खटला फेटाळला जातो आणि पती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य सुटकेचा श्वास सोडतात मात्र अशा वेळेस या खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलांना चांगला धडा शिकवता येतो तो पुढील कलमान्वये
Indian Penal Code 1860 According_to Sec- 499
भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 499 अन्वये
शाब्दिक ,लेखी, छापीव, कोरीव साहित्य ज्यातून व्यक्तीची, कुटुंबाची, कंपनीची अथवा व्यक्ती समूहाची बदनामी होईल त्याला मानहानी मानले जाईल
एखाद्या व्यक्तीविषयी अपमानजनक भाषेचा वापर करणे व खोटे आरोप करणे हेदेखील मानहानी मानले जाईल त्यामुळे एखादी महिला एखाद्या कुटुंबाविषयी किंवा व्यक्तीविषयी खोटे कौटुंबिक अत्याचाराचे आरोप करत असेल वा खोटा गुन्हा दाखल केला असेल व न्यायालयात तो खटला पुराव्याअभावी फेटाळून लावला गेला असेल अशावेळी सदर महिलेवर पती मानहानीचा दावा दाखल करू शकतो
Indian Penal Code 1860 According_to Sec- 500
भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 500 अन्वये मानहानी बद्दलचे शिक्षेचे प्रावधान करण्यात आले आहे जो कोणी व्यक्ती एखाद्या व्यक्तीची व्यक्ती समूहाची कुटुंबाची अथवा कंपनीची मानहानी करेल अशा व्यक्तीला दोन वर्षाचा सजा व दंडाचे प्रावधान करण्यात आले आहे
तरी सदर खटला हा सजा अथवा दोघी पक्षामध्ये समझोता होऊन हा खटला संपुष्टात येऊ शकतो
अत्यंत महत्त्वाची सुचना -
(एखाद्या महिलेवर खरोखर कौटुंबिक अत्याचार होत असेल तर मात्र हा पर्याय बचाव म्हणून वापरता येणार नाही कारण त्यासाठी खटला पुराव्याअभावी फेटाळून लावला गेलेला असावा त्यामुळे असा खटला अपवाद वगळता येईल)
0 टिप्पण्या