असा शिकवा भांडखोर व दुखापत पोहचवणार्या इसमाला धडा
असा शिकवा भांडखोर व दुखापत पोहचवणार्या इसमाला धडा
सामान्य (साधारण) स्वरुपाची दुखापत
नमस्कार मित्रांनो आपल्या गावात शहरात राहत असतांना आपले इतरांचे मत भेद होणे स्वाभाविकच आहे असे मतभेद विकोपाला पोहोचतात व त्यातून भांडणे होत असतात आणि भांडणात बऱ्याच वेळा लाट्या काट्यांचा वापर होतो व या केसेस पोलीस स्टेशन मध्ये पोहता व त्यातून कायद्याची प्रक्रिया सुरू होते बऱ्याच वेळा या प्रक्रियेतून आपल्यालाही जावं लागतं त्यावेळी कोणत्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो चला तर मग बघूया आपले कायदे या आपल्या ब्लॉगवर
✒ Indian Penal Code 1860
Sec 319
भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 319 अंतर्गत एखाद्या व्यक्तीला दुर्बल करण्याच्या हेतूने केलेले कृत्य शारीरिक इजा अथवा एखाद्या आजाराने ग्रस्थ करण्याच्या हेतुने किंवा क्षती पोहोचवण्याच्या हेतूने केलेली इजा साधारण दुखापत मानली जाईल
✒ Indian Penal Code 1860
Sec 323
भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 323 अन्वये एखादी व्यक्ती हेतुपुरस्कर एखाद्या व्यक्तीला क्षती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यास एक वर्ष कारावास व दंड किंवा दोन्हीही होऊ शकते
भारतीय दंड संहिता 1860 कलम 319 अन्वये नमूद केलेली दुखापत म्हणजेच साधारण दुखापत होय जी दुखापत हेतुपुरस्कर पिडीताच्या मृत्यूचे कारण ठरणार नाही अशा दुखापतीला साधारण दुखापत मानले जाईल
इच्छापुर्वक पोहचवलेली दुखापत म्हणजे काय
एखाद्या व्यक्तीला दुखापत पोहोचवणे अपराध असू शकतो अशी कल्पना त्याव्यक्तीस हवी व सदरील व्यक्ती ला त्याविषयी होणाऱ्या शिक्षेचे ज्ञान असावे तसेच त्या व्यक्तीची इच्छा साधारण दुखापत करण्याची असली पाहिजे तर
एका केसेसमध्ये A ने B च्या डोक्यात 200 ग्रॅम लोखंडी राँडीने मारले व त्यामुळे B चा मृत्यू झाला मात्र A चा B ला मारण्याचा कोणताही हेतू नव्हता व 200 ग्रॅम हे वजन अतिशय साधारण असे मानले जाऊन IPC 323 अन्वये साधारण दुखापत पोहोचवण्याची शिक्षा ठोठावण्यात आली
0 टिप्पण्या