बर्याचावेळा आपल्याला आपले नातेवाईक , मिञ , आणी आपल्या व्यवसायीकांकडुन चेकने व्यवहार करणे पसंत असते माञ आपल्यापुढे समस्या तेव्हा ऊभी राहते ती जेव्हा चेक बाऊंन्स होतो आणी त्यापुढे आपले अधिकार आपल्याला माहित नसतात आणी आपले नुकसान होते चला तर मग बघु चेक बाऊन्स झाल्यावर आपण काय करु शकतो आणी आपले अधिकार काय असतात आपले कायदे ब्लाँग च्या फाईल मधुन
आपला चेक बाऊन्स झाल्यावर आपल्याला चेक (Self and account)पुन्हा खाञीसाठी चेक बँकेत जमा करु शकतो माञ तरीही चेक बाऊन्स झाला तर तुम्ही सदर चेक देणाऱ्या व्यक्तीवर ३ प्रकारे दावा व गुन्हा दाखल करु शकता
त्यातील पहिला प्रकार म्हणजे
1- Negotiale Instrument Act 1881
या कायद्याचे कलम 138 अन्वये 30 दिवसांच्या आत तुम्ही समोरील पार्टीला तुमच्या वकीलामार्फत डिमांड नोटिस (Demand Notice)पाठवू शकता त्या 15 दिवासांच्या कालावधीत त्याने तुम्हाला पैसे देणे बाध्य असते त्यात तुम्ही नोटिस साठी येणारा खर्चही मागू शकता माञ त्याने न दिल्यास तुम्ही पुढिल 30 दिवसांच्या आत न्यायालयात केस फाईल करु शकता
त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपञे
1 आपला चेक (बाऊन्स झालेला चेक)
2 चेक बँकेत भरतांना घेतलेली स्लीप
3 चेक बाऊन्सींग स्लीप (बँकेच्या शिक्का व सही सह)
4 डिमांड नोटिस
5 पोस्टल स्लीप
6 सामनेवाला पार्टीला नोटिस मिळाली किंवा नाही आणी जर नाही मिळाली तार त्याचे काय कारण मिळाले
7 वादिने पाठवलेल्या नोटिसीचा जबाब मिळाला तर काय मिळाला त्याची प्रत
8 वादि व प्रतिवादी यांमध्ये काही करार झाला असल्यास त्याची प्रत
दाव्यात आवश्यक असते व अन्य पुरावे द्यावे लागतात व evidence by the Affidavit द्यावे लागते
त्यात सजा 2 वर्ष कारावास व चेक रकमेच्या दुप्पट रक्कम दंड स्वरुपात आकाराली जाते
0 टिप्पण्या