Header Ads Widget

कोणत्याही हद्दितल्या पोलिस स्टेशमध्ये नोंदवु शकता तुमची तक्रार | You can report your complaint to any local police station

कोणत्याही हद्दितल्या पोलिस स्टेशनमध्ये नोंदवु शकता तुमची तक्रार


अनेकदा आपल्याला आपले पोलिस स्टेशनची हद्द माहित नसते किंवा अशी परिस्थिती असते की आपण आपल्या हद्दीतल्या पोलिस स्टेशनला जाऊ शकत नाही अशा वेळेला आपण गोंधळून जातो माञ पोलिस तुम्हाला तुमच्या हद्दीतल्या पोलिस स्टेशनला जा असे सांगतात तेव्हा तुमचा त्याच पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचा अधिकार आहे तो कसा आणी काय आहे झीरो एफ.आय. आर.  चला बघुया 

माञ झीरो FIR बघण्याआधी गुह्याचे प्रकार समजुन घेणे महत्त्वाचे आहे

1} cognizable offence (दखलपाञ गुन्हे)
2} Non cognizable offence (अदखलपाञ गुन्हे)

Non cognizable offence (अदखलपाञ गुन्हे)  
अदखलपाञ गुन्ह्यामध्ये फार तर  FIR दाखल होत नाही माञ आपली तक्रार magistrate ला
Refer केली जाते जर Magistrate ला वाटले तर ते आपल्या तक्रारीवरुन आरोपीला समन्स काढु शकतात

Cognizable Offence (दखलपाञ गुन्हे)

या गुन्ह्यांना गंभीर स्वरूपाचे गुन्हे म्हणतात हे गुन्हे अजामीनपाञ असतात (उदा. हत्या, दरोडा, रेप आदि.) गुन्हे यामध्ये येतात या  दखलपाञ गुन्ह्यांमध्ये पोलीस  Zero FIR दाखल करु शकतात

  • काय असते झीरो एफ. आय.आर.
झीरो FIR हि 00 सिरीयल नंबरने दाखल केलेली असते झीरो FIR आपण कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये दाखल करु शकतो त्यानंतर सदर पोलीस स्टेशन आपल्या हद्द पोलीस स्टेशनला झीरो FIR वर्ग करतात /पाठवतात आणी हद्द पोलीस स्टेशन त्यावर तात्काळ तपास सुरु करतात व पुरावे नष्ट होण्याआधी पुरावे जमवण्याचा करण्याचा प्रयत्न करतात
त्यामुळे पोलिस स्टेशन कोणतेही असो Cognizable offence म्हणजे दखलपाञ गुन्हा तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनला नोंदवू /दाखल करु शकता

Criminal Procedure Code 1973 (Sec 154)

CrPC sec. 154 अन्वये संबंधित पोलीस स्टेशनला तुमची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचारी बाध्य असतात
तसेच पोलीस Zero FIR नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत असतील तर 

०  S.P / C.P. 

तक्रार नोंदवून घ्यायला पोलीस टाळाटाळ करत असतील तर S.P किंवा C.P. कडे तक्रार करु शकता त्यानुसार S.P. स्वतः तुमची तक्रार नोंदवून घेतील व S.P. किंवा इतरत्र अधिकार्याची नेमणूक करुन पुढील तपास सुरु करतील 

मानवाधिकार आयोग (Human Right Commission) 

सदरची तक्रार मानवाधिकार आयोग कडे करु शकता आयोग वरिष्ठ अधिकार्यांना निर्देश देतील 

न्यायालय (Court)

न्यायालयाकडे तुम्ही तक्रार दाखल करणेसाठी दावा करु शकता न्यायालय पोलीसांना FIR दाखल करण्याचे आदेश देतात

Indian Penal Code 1860 (Sec 166 A)

भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 166 (अ) अन्वये सदर लोकसेवकावर म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांवर
(ज्याने Zero FIR दाखल करुन घेण्यास नकार दिला) 
गुन्हा दाखल करु शकता अथवा त्यासाठी न्यायालयात (Court) तक्रार दाखल/दावा करु शकता
त्यानुसार दोषी कर्मचाऱ्यांस एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सजा होऊ शकते
त्यामुळे झीरो FIR सगळ्यांचा अधिकार आहे वेळप्रसंगी त्याचा वापर करणे योग्य असते




                          

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Nice