सोशल मिडीया वरील अशी पोस्ट केली तर जावे लागेल जेलमध्ये | Don't make any mistake while posting on social media, otherwise you will go to jail
धार्मिक भावना दुखावल्यास
सध्या अनेक ठिकाणी आपल्याला धार्मिक भावना दुखावण्यार्या गोष्टी बघावयास मिळतात त्यात प्रत्यक्ष किंवा फेसबुक | Facebook , इंस्टाग्राम | Instagram , टिकटाँक | Tiktok , reels, Twiter, Snapchat, अन्य सोशल मीडियावर | Social Media किंवा अन्य ठिकाणी एखाद्या धर्माचा अपमान अथवा धार्मिक भावना दुखावल्या जात असतील आणि त्यावेळी बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की या द्वेषभावना पसरविणाऱ्या लोकांना आळा बसला पाहिजे आणि समाजातील वातावरण हे एकीचे असावे म्हणून अशा लोकांवर वेळीच कार्यवाही झाली पाहिजे चला तर मग बघुया काय कारवाई होऊ शकते आपले कायदे ब्लाँगवरुन
Bharatiya Nyay Sanhita 2023 Chapter 15
Offences Relating to Religion
० Bharatiya Nyay Sanhita 2023
Sec 298
भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 298 अन्वये एखाद्या धर्माच्या धार्मिक भावना दुखावणे धर्माचा अपमान करणे किंवा किंवा त्या धर्मातील महापुरुषांचा अपमान करणे व त्यांच्या धार्मिक भावना दुखावणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून त्यासाठी तीन वर्षाची सजा देण्यात येते
० Bharatiya Nyay Sanhita 2023
Sec 298
भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 298 अन्वये एखाद्या धर्माच्या लोकांचे प्रार्थना स्थळ अथवा त्यांचे धार्मिक ठिकाण अपवित्र करण्याच्या इराद्याने केलेले कृत्य या कलामान्वये धार्मिक अपराध आहे यासाठी दोषीला दोन वर्षाची सजा दंड अथवा दोन्ही होऊ शकतात
० Bharatiya Nyay Sanhita 2023
Sec - 300
भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 300 अन्वये धार्मिक पूजेसाठी जमलेल्या जमावाच्या धार्मिक कार्यात विघ्न आणणाऱ्या व्यक्तीस एक वर्षाची सजा व दंडाचे प्रावधान करण्यात आले आहे
० Bharatiya Nyay Sanhita 2023-
Sec 301
भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 301 अन्वये एखाद्या धर्माच्या पूजेच्या ठिकाणी अतिक्रमण करणे अथवा अंत्यसंस्कार विघ्न आणणे किंवा मृत्यू देहाची अवहेलना करणे किंवा तसा प्रयत्न करणे हा दखलपात्र गुन्हा असून त्यासाठी एक वर्ष सजे चे सावधान करण्यात आले आहे
० Bharatiya Nyay Sanhita 2023
Sec - 302
भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 302 धार्मिक भावना दुखावण्याचा हेतूने केलेला हावभाव अथवा शब्द उच्चारणे हासुद्धा धार्मिक अपराध मानला जातो व त्यासाठी ही एक वर्ष सजेचे प्रावधान करण्यात आले आहे
त्यामुळे कोणी तुमच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करत असेल किंवा धार्मिक भावना दुखावत असेल किंवा सोशल मीडियावर कोणत्याही धर्माचा आप प्रचार करत असेल तर अशा इसमास या कलमान्वये चांगलीच अद्दल घडून देऊ शकता व समाजातील शांतता व एकता कायम ठेवू शकता
0 टिप्पण्या