अवश्य करा हे पर्याय - पोलिसांनी FIR दाखल करुन घेतली नाही तर
अनेक लोकांचे अनुभव आहेत की त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा (FIR) नोंदवण्यासाठी गेले असता सदरील पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये त्यांची FIR नोंद घेण्यासाठी नकार दिला अथवा नोंदवून घेतली नाही किंवा त्यासाठी हेतुपुरस्कर टाळाटाळ करत असतील असे अनेक कारणे आहेत मात्र काहीवेळा पोलीस निष्काळजीपणा करत असतात त्यामुळे बऱ्याचदा लोक असा प्रश्न विचारतात की यावर काही पर्याय आहेत का? तर हो आहेत आणि काय आहेत ते पर्याय चला पाहूया आपले कायदे या ब्लॉगवर
हे पर्याय बघण्याआधी गुन्ह्यांचे प्रकार बघावे लागतील
गुन्ह्यांचे प्रकार
1) Cognizable Offence
2) Non Cognizable Offence
1) Cognizable Offence Cr.P.C.- 154 (गंभीर गुन्हे)
म्हणजे अजामीनपात्र गुन्हे यामध्ये एफ आय आर दाखल होते आणि ती एफ आय आर रजिस्टर मध्ये दाखल केले जाते
2) Non Cognizable Offence Cr.P.C.-155
(सामान्य गुन्हे)
(सामान्य गुन्हे)
हे गुन्हे जामीनपात्र असतात व हे गुन्हे एनसीआर रजिस्टर मध्ये नोंदवले जातात
- ० Criminal Procedure Code 1973 Sec 154
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 154 अन्वये FIR नोंदवून घेणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे हा सर्व लोकांचा अधिकार आहे
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 20 अन्वये FIR ही तोंडी किंवा लेखी असू शकते व तोंडी असल्यास लिहिण्याची जबाबदारी पोलिसांची असते व एक FIR ची एक कॉफी विनामूल्य देणे गरजेचे असते तसेच पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्यास
- ० Criminal Procedure Code 1973 Sec 154(2)
फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 154 ( 2) नुसार संबंधित पोलीस अधीक्षक ( S.P.) किंवा पोलीस आयुक्त (C.P.) यांच्याकडे लेखी तक्रार करू शकता त्यानंतर पोलिस अधीक्षक तुमची तक्रार लिहून घेतील व स्वतः त्याचा तपास करतील अथवा अन्य अधिकार्याची नियुक्ती करतील
- ० Criminal Procedure Code 1973 Sec 156 (3)
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 156 (3) अनुसार न्यायालयात अर्ज करू शकता त्यानुसार न्यायालय संबंधित पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवून घेण्याचे आदेश देतात व आपली FIR नोंदवली जाते तेव्हा सदरील कोर्टामध्ये अर्ज केल्यावर तुम्ही कोर्टाला योग्य ते पुरावे दिल्यास आपल्या केसची समरिंग सुरू करतात व केस ची ट्रायल कोर्टात सुरू होऊ शकते
त्यामुळे पोलिसांनी तुमची तक्रार नोंदवून घेतली नाही तर तुम्ही वरील प्रमाणे कारवाई करून तुमची एफआयआर नोंदवून घेऊ शकता
0 टिप्पण्या