Header Ads Widget

वैवाहिक वादविवादाला कंटाळून माहेरी निघुन गेलेल्या पत्नीला परत कसे बोलवाल / conjugal right

पाठवणीचा दावा



अनेकदा हास्याची मैफिल जमवायची असेल तिथे पती-पत्नीचे विनोदाचे किस्से किंवा जोक्स ऐकल्याशिवाय किंवा मोठ्या हास्य कवी संमेलनामध्ये पती-पत्नीच्या नात्याचा उल्लेख आणि त्यांच्या वादविवादाचे किस्से सांगितल्याशिवाय हास्याची मैफिल च रंगणार नाही मात्र हे नाते जेवढे हास्यासाठी प्रसिद्ध असेल तेवढेच ते वाद-विवाद यासाठीही प्रसिद्ध आहे आणि कधी कधी तर या नात्यातील वाद इतके विकोपाला जातात की त्यासाठी वधूपक्ष/ वरपक्ष यापैकी दोघांनाही न्यायालयाची पायरी  देखील चढावी लागते तर कधी पोलिसांचा ही पाहुणचार घ्यावा लागतो 
आणि अशा वादविवादातून होणाऱ्या दुरावा म्हणजे पत्नी माहेरी तिच्या आई-वडिलांकडे जाऊन राहते त्यामुळे दोघांमधील संवाद संपतो आणि सामंजस्य घडून येत नाही पतीपक्ष पत्नीच्या माहेरी जाऊन पत्नीला सासरी  आणण्याचा प्रयत्न करतात मात्र पत्नीचा येण्यास सपसेल नकार असतो अशावेळी काय कराल अधिक माहिती आपले कायदे ब्लाँगवर

  • Hindu Marriage Act 1955
Sec - 9 Restitution of conjugal right 
 
 हिंदू विवाह अधिनियम 1955 चे कलम 9 (वैवाहिक अधिकार) अन्वये पतीला पत्नीपक्षावर पाठवणीचा दावा करता येतो त्यात पत्नीला नांदावयास बोलावण्याचा हेतु असतो
पाठवणीचा दावा दाखल केल्यावर पत्नीला समन्स बजावून पुढील तारखेस कोर्टात हजर राहण्यास सांगतात व
 पत्नीचा जबाब घेतला जातो त्यात 
पत्नी चार प्रकारचे जबाब नोंदवू शकते 

1- नांदावयास तयारी दर्शवते

 2-कौंटुबिक छळाचा आरोप करते (Domestic violence)

3- नांदावयास नकार देते  (Separation) 

4- न्यायाधीशांना निकाल देण्यास सांगते (Judgement)

1- पत्नी नांदायला तयार असेल तर पती तिला सहखुशी/आनंदाने नांदायला घेऊन जाऊ शकतो व संसाराला सुरुवात करु शकतात व वाद इथेच संपुष्टात येतो 

2- जर पत्नीने येऊन कौटुंबिक हिंसाचार (domestic voilence)चा आरोप केला तर अशावेळी न्यायालय तिच्याकडे भक्कम पुराव्याची मागणी करेल  म्हणजेच( Burden of Proof)आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी पत्नीवर असेल त्यासाठी तिला भक्कम असे पुरावे सादर करावे लागतील पुरावे सादर करण्यास पत्नी असमर्थ असेल किंवा तसे पुरावे नसतील तर पत्नी (domestic violence) म्हणजेच कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवू शकत नाही

3-  नांदायला नकार 
  •  अ] जर पत्नीचा नांदावयास नकार असेल त्याआधारे पती (Divorce Case) घटस्फोट केस दाखल करू शकतात 
  •  ब] दोन वर्षापेक्षा अधिक काळ पत्नी माहेरी असेल तर लगेचच घटस्फोट मिळू शकते 
  •  क] पत्नीला कोणत्याही स्वरूपाचे पोटगी देण्यासाठी पती बाध्य नसतो 

4 - निकाल (Judgement)  अशा केसेस मध्ये न्यायाधीश पत्नीला कमीत कमी सहा महिने नांदायला  जाण्याचे आदेश देतात 




  • ०पाठवणीच्या दाव्याचे फायदे०

 1-  Proof Of domestic voilence And IPC- 498 (A) 

पत्नीने पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला असल्यास पाठवणीच्या दाव्यातील निकाल(Judgment) पती पुरावा म्हणून वापरू शकतात तसेच कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाल्यावर पाठवणीच्या दाव्यातील निकाल(Judgment) दाखवल्यावर पोलीस पतीला अटक करणार नाहीत

 
2- Maintenance /CrPC 125(पोटगी) -

पत्नीने पोटगीचा दावा केल्यास पती पाठवणीच्या दाव्यातील  निकाल (Judgment)  च्या आधारे पोटगी देण्यास नकार देऊ शकतो 


3- Wife is not present in court -

 पतीने केलेल्या पाठवण्याचा दावात समन्स जारी होऊन देखील पत्नी न्यायालयात हजर राहिली नाही तर न्यायाधीश पतीच्या हक्कात निकाल देतील त्याआधारे घटस्फोट मिळणे शक्य होते 


4- Wife in present in court

 पत्नी कोर्टात हजर राहील व वरील जबाब नोंदवून नांदायला येईल आणि परत पुन्हा काही दिवसांनी कौटुंबिक हिंसाचार होत असल्याचा आरोप करेल तरीही पत्नीलाच यासंबंधी भक्कम पुरावे सादर करावे लागतील Burden of proof)पत्नीवर असेल
  •  निकाल मिळाल्यावरही पत्नी सोबत राहत नसेल तर (Contempt of Court) ची केस दाखल करू शकतात


          

Hindu Marriage Act, 1955,
marriage act 1955, हिंदू विवाह कायदा कलम 9, 
Hindu Marriage Act, 1955 in Marathi,
पोटगी किती द्यावी लागते, घटस्फोटाची कारणे, पाठवणीचा दावा,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या