हक्कसोडपञ | Release Deed हक्कसोडपञ केले असेल किंवा करणार असाल तर आत्ताच बघा तुम्ही हि चुक केली आहे का | अशी चुक होऊ शकते
हक्कसोडपञ / Release Deed
हक्कसोडपत्र म्हणजे काय व ते कसे करावे | What is a release deed and how to do it
वारंवार शेतीसंबधी किंवा शेतीचा वाद अथवा विषय आला तर नेहमी हक्कसोडपञाचा उल्लेख येतोच आणी आजही बर्याच लोकांना हक्कसोडपञ दस्तऐवज म्हणजे काय आणी ते दस्तऐवज का केला जातो. असा प्रश्न नेहमीच लोक विचारत असतात त्यामुळे आपसाआपसातील हस्तांतरणही करता येतात.
हक्कसोडपत्र म्हणजे काय | What is a Release deed
वारसाहक्कानुसार सामाईक कुटुंबात सर्वच वारसांना समान हिस्सा मिळतो अथवा सामाईक संपत्तीतील सर्वच सदस्यांना समान हिस्सा मिळतो त्यामुळे सर्व संपत्ती समान हिस्यात विभागले जाते आणि सदर क्षेत्राचे खातेफोड होण्याआधी किंवा विभागणी होण्याआधी
एखाद्या सामाईक कुटूंबातील सदस्य कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांच्या हक्कात स्वतःसाठी मिळणारा संपत्तीचा वैयक्तिक हिस्सा स्वेच्छेने त्याच कुटुंबामधील इतर सदस्यांच्या लाभासाठी कायमस्वरूपी आपला हक्क त्यास देत असेल अशा दस्तऐवजास हक्कसोडपञ म्हणतात

हक्कसोडपञ कोण करु शकते | Who can release deed the rights?
हक्कसोडपञाचा दस्तऐवज एकत्र कुटुंबामधील कोणत्याही स्त्री पुरुष सदस्याला करता येतो हक्कसोडपञाचा दस्तऐवज हा फक्त वारसाहक्काने मिळालेल्या एकत्र कुटुंबातील मिळकतीवरील स्वतःच्या हिस्स्याच्या मिळकतीपुरते करता येऊ शकते. त्यात स्वतंत्रपणे विकत घेतलेल्या मिळकतीवर किंवा खातेफोड अथवा विभागणी झाल्यावर होऊ शकत नाही त्यानंतर खरेदि विक्री , बक्षिसपञ, असे अनेक संपत्ती हस्तांतरणाच्या पध्दती चा अवलंब करु शकता. माञ हक्कसोडपञाचा दस्तऐवज कुटुंब व्यतिरिक्त अन्य व्यक्तीच्या नावे आपल्याला करता येऊ शकत नाही तसे केल्यास मुंबई मुद्रांक कायदा १९५८ मधील तरतुदीनुसार खरेदीखताप्रमाणे मुद्रांकशुल्क आकारले जाते
हक्कसोडपञ कसे करावे | How to make a release deed
आवश्यक कागदपञे | important document
१] २०० रुपये किंमतीचा मुद्रांक स्टँम्प पेपर
२] मिळकतीचा मिळकत उतारा
३] कुटुंबातील सदस्य असल्याचा पुरावा किंवा वंशावळ
४] हक्कसोडपञ लिहून घेणाऱ्याचे ओळखपञ
५] हक्कसोडपञ लिहून देणाऱ्याचे ओळखपञ
६] दोन साक्षीदारांचे ओळखपञ
२] मिळकतीचा मिळकत उतारा
३] कुटुंबातील सदस्य असल्याचा पुरावा किंवा वंशावळ
४] हक्कसोडपञ लिहून घेणाऱ्याचे ओळखपञ
५] हक्कसोडपञ लिहून देणाऱ्याचे ओळखपञ
६] दोन साक्षीदारांचे ओळखपञ
Transfer of Property Act 1882 Sec. 123
मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२ कलम १२३
अन्वये सहसा हक्कसोडपत्र विनामोबदला केले जाते किंवा मोबदल्यातही केले जात असेल तरिही त्यांची नोंदणीशुल्क २०० रु एवढेच असते व एकत्र कुटुंबातील सदस्यांच्या लाभासाठी केला जात असल्याने त्यासाठी मुद्रांक शुल्क आकारले जात नाही. मात्र त्याची नोंदणी केली जात असल्याकारणाने त्यावर नोंदणी शुल्क आकारले जाते व नोंदणीकृत हक्कसोडपत्रच ग्राह्य धरले जाते जर हा दस्त नोंदणीकृत नसेल तर सरकारी दफ्तरी नोंद होऊ शकत नाही कारण विनानोंदणीकृत किंवा तोंडी हक्कसोड सिध्द करणे कठीण असल्याने या दस्ताआधारे हक्कांचे हस्तांतरण होत असते त्यामुळे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२ कलम १२३ अन्वये असे हस्तांतरण नोंदणीकृत असणे आवश्यक असते

The Registration Act 1908 Sec. 17
नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम १७ अन्वये स्थावर संपत्ती व स्थावर मालमत्तेचे लेखे हक्कसोडपञ , बक्षिसपञ, दान आदि हक्क हस्तांतरणाचे लेख नोंदणीकृत असावे
हक्कसोडपञ 200 रुपयांच्या मुद्रांकपत्रावर लेखी व नोंदणीकृत असावे लागते आणी त्यातील मजकूरासंबधी माहिती
१] हक्कसोडपत्र लिहून देणाऱ्याचे
a) नाव
b) वय
c) पत्ता
d) व्यवसाय
b) वय
c) पत्ता
d) व्यवसाय
याविषयी तपशिल असणे आवश्यक आहे
हक्कसोडपञ ज्या व्यक्तीच्या हक्कात लिहून व नोंदवून देत असलेल्या व्यक्तीची माहिती
हक्कसोडपञ ज्या व्यक्तीच्या हक्कात लिहून व नोंदवून देत असलेल्या व्यक्तीची माहिती
२] हक्कसोडपत्र लिहून घेणाऱ्याचे
a) नाव
b) वय
c) पत्ता
d) व्यवसाय
b) वय
c) पत्ता
d) व्यवसाय
३] ज्या संपत्तीचे हक्कसोडपञ करत आहात हिस्सासह विवरण
४] हक्कसोडपञ दस्ताचा मुळ मजकुर
५] लिहून देणाऱ्याचे नाव व स्वाक्षरी
६] लिहून घेणाऱ्याचे नाव व स्वाक्षरी
७] साक्षीदारांची नावे व स्वाक्षरी
८] संपत्तीचा उतारा अथवा प्राँपर्टी कार्ड
४] हक्कसोडपञ दस्ताचा मुळ मजकुर
५] लिहून देणाऱ्याचे नाव व स्वाक्षरी
६] लिहून घेणाऱ्याचे नाव व स्वाक्षरी
७] साक्षीदारांची नावे व स्वाक्षरी
८] संपत्तीचा उतारा अथवा प्राँपर्टी कार्ड
९] एकञ कुटुंबातील सदस्य असल्याबाबतचा पुरावा अथवा वंशावळीची पञ
नेहमी अधिकारी वर्ग आधी संपत्तीच्या उतार्यावर नाव दाखल झाल्यावरच हक्कसोडपञ करता येत असल्याचे सांगतात माञ हा दस्त उतार्यावर नावे नसतांनाही किंवा नावे दाखल होण्याआधीही करता येतो त्यासाठी उतारा अथवा संपत्तीच्या कार्डवर नावे असणे आवश्यक नाही
त्यानंतर हक्कसोडपञाची मुळप्रत, नोंदणीची मुळ पावती व सुची २ ची प्रत अशा प्रकारे तयार करण्यात आलेले हक्कसोडपत्र तलाठ्याकडे जमा करावे
हक्कसोड पञाची सुची क्रमांक २ नुसार गावकामगार तलाठी / भुमापण अधिकारी फेरफार मध्ये नोंद घेऊन संबंधितांना नोटिसा बजावतात व कोणाचा त्यासंबंधी आक्षेप नोंदवण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देतात जर कोणीही तक्रार नोंदवली नाही तर मंडळ अधिकाऱ्यांमार्फत नोंद मंजुर करुन घेतली जाते
हक्कसोडपत्रानंतरच्या नोंदी | Entries after release deed

उदाहरण बघु एखाद्या मयत व्यक्तीच्या नावावर एकच संपत्ती असेल व त्याला एकूण चार मुले असतील तर तो व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याचे कायदेशीर वारस म्हणून त्यांची पत्नी दोन मुले व दोन मुली अशा आहेत आणि या पाचही वारसांची नावे वारसहक्काने संपत्तीच्या उताऱ्यावर लागले व त्यानंतर काही दिवसांनी दोन्ही मुलींनी आपल्या दोघी भावांच्या हक्कात हक्क सोडपत्र करून दिले आणि त्या हक्कसोड पत्राची नोंद झाली व त्यानंतर काही दिवसांनी मयताची पत्नी मयत पावली तेव्हा वारसांचा प्रश्न निर्माण होतो कारण बहिणींनी भावांच्या हक्कात करून दिलेले हक्कसोडपत्र ग्राह्य धरले जाईल की आईच्या संपत्तीवर कायदेशीर वारस अशावेळी बहिणींनी भावांच्या हक्कात करून दिलेले हक्कसोडपत्र ग्राह्य धरले जाईल व सदर संपत्तीवर बहिणींचा कोणत्याही स्वरूपाचा हक्क उरणार नाही त्यामुळे बहिणींची व भावांची आई मयत झाल्यानंतर त्या संपत्तीवरील हक्क बहिणींना मागता येणार नाही त्यामुळे सदर हक्कसोडपञाच्या नोंदिचा उल्लेख आईच्या वारस पत्रात करणे आणि अनिवार्य आहे
किंवा
एखाद्या मयत व्यक्तीच्या नावे दोन किंवा त्यापेक्षा अनेक ठिकाणी संपत्ती असल्यास व ती व्यक्ती मयत झाल्यास त्याच्या उपरोक्त मिळकतीला कायदेशीर वारस म्हणून पत्नी व दोन मुले व दोन मुली असे एकूण पाच वारसांचे वारस हक्क सदरील नाव दाखल झाल्यानंतर त्यातील दोन वारस मुलींनी भावांच्या हक्कात हक्कसोडपत्र करून दिल्यानंतर या हक्कसोडपत्राची योग्य ती नोंद घ्यावी व कोणत्या संपत्तीवरील हक्क सोडला कोणत्या संपत्तीवरील हक्क शाबूत ठेवला आहे याविषयी सविस्तर माहिती हक्कसोडपञात घेणे गरजेचे असते त्यामुळे ज्या संपत्तीवरील हक्क अबाधित ठेवला आहे त्या संपत्तीवरील मालकी हि मुलींची कायम असेल कालांतराने मयताची पत्नी हि मयत झाल्यास वारसांना ज्या संपत्तीवरील मुलींनी हक्कसोडपत्र करून दिले आहे. त्या नोंदीचा उल्लेख करून सदर संपत्तीवर मुलींचा हक्क राहणार नाही व वारस सदरी नाव ही दाखल होणार नाही मात्र ज्या संपत्तीवरील हक्क अबाधित ठेवला आहे त्या संपत्तीवर मुलींचा हक्क असेल व त्या संपत्तीवर दोघे भाऊ दोघी बहिणी ही वारस म्हणून समहिस्सेदार असतील अशी नोंद करुन घ्यावी
माञ सदरचा दस्त हा किचकट व त्यातील पळवाटा लक्षात घेता असा दस्त जाणकार वकिलांमार्फत नोंदणे योग्य असते
0 टिप्पण्या